मुंबई। आज मला आनंद होत आहे की, एक मराठी मुलगा ज्यानं डिजीटल प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्यावसायिक ॲप तयार केलं. ज्यामधून अनेक मराठी मुलांना रोजगार मिळू शकतो. कारण आज नोकऱ्यांची स्थिती काय आहे ? कारखाने कसे बंद होत आहेत. याबाबत आता नव्याने सांगणे नाही. म्हणून स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. मात्र स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी देखील कुठेतरी मार्ग हवा असतो. आपल्या व्यवसायाला ग्राहक वर्ग हवा असतो. आज प्रत्येकाकडे असणाऱ्या कौशल्याचं मार्केटींग कसं करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर उदय पवार यांनी दिलं आहे. तुमच्या कौशल्याचं मार्केटींग टिंग टाँग ऑनलाईन करेल. प्रत्येकाला स्वत:चा ग्राहक वर्ग मिळवून देण्याचे काम टिंग टाँग ऑनलाईन ॲप द्वारे होणार आहे. ज्याप्रमाणे कुठल्याही आजारावर एकच रामबाण उपाय त्याचप्रमाणे कुठल्याही कामाचा एकच मार्ग टिंग टाँग ऑनलाईन अप्लिकेशन असे गौरवोद्गार खासदार अरविंद सावंत यांनी काढले.
टिंग टाँग ऑनलाईन ॲप अधिकृतरित्या अनावरण अरविंद सावंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कामगार सेनेचे अजित साळवी उपस्थित होते.
प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न या ॲपद्वारे करण्यात येईल असा विश्वास आज उदय अशोक पवार या नवउद्योजकांने दिला आहे. नोकऱ्या सुरक्षित करण्याचे काम करता करता कामगार सेना मराठी माणसांशी जोडली गेली. मराठी माणसाच्या घरी समृद्धी आली पाहिजे. त्यांनी उत्कर्ष व्हायला पाहिजे. त्याच बरोबर शैक्षणिक व आर्थिक उत्कर्ष सुद्धा व्हायला पाहिजे. याच भावनेतून आज एक मराठी युवक व्यापाऱी क्षेत्रात उभा राहात आहे. त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्याचे मनोधैर्य वाढवावे या भावनेनेच आज मी या ठिकाणी आलो आहे असल्याचेही सावंत म्हणाले, ज्याच्याकडे आपलं स्वत:चं कौशल्य असेल त्यांनी त्यांनी या टिंग टाँग ऑनलाईन ॲप वर जाऊन आपली नोंदणी करावी, त्यांना शंभरटक्के रोजगार दिल्याशिवाय टिंग टाँग ऑनलाईन राहणार नाही असे आश्वासन आणि टिंग टाँग ऑनलाईन चे सर्वेसर्वा उदय अशोक पवार यांना त्यांच्या कार्यात उज्वल यश प्राप्त होवो अशी शुभेच्छा खासदार सावंत यांनी दिल्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उदय पवार म्हणाले, माझं स्वप्न होतं की जो मध्यमवर्ग आहे जो छोटा मोठा व्यवसाय करतो. त्याला एक डिजीटल प्लॅटफॉर्म मिळावा. या छोट्या उद्योगसमुहाला एक मोठा ग्राहकवर्ग मिळावा यासाठीच्या विचारातून या टिंग टाँग ऑनलाईन ची निर्मिती झाली. डिजीटल मार्केटींग मध्ये अशा प्रकारच्या अनेक ॲप उपलब्ध आहेत. मात्र त्या संपूर्णपणे व्यवसायिक स्वरुपाच्या आहेत. आपण आपल्या या ॲपच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण देखील जपणार आहोत. प्रत्येकाला त्याच्या कौशल्यावर आधारीत ग्राहक वर्ग मिळायलाच हवा असा कटाक्ष आपल्या ॲपचा असेल. त्यासाठी व्यावयासिकांकडून आम्ही दिवसाला केवळ एक रुपया इतकंच शुल्क आकारणार आहोत. यामुळे हा ॲप व्यावसायिकतेपासून खूप दूर असल्याचे आपल्या लक्षात येईल.
भविष्यात फ्रॅन्चाईजच्या माध्यमातून या ॲपचं जाळ अधिक विस्तारित करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना याचा फायदा होईल. या कार्यक्रमाला आणि माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या पाठिशी सदैव उभे असणारे खासदार अरविंद सावंत वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी राहिन असे उदय पवार म्हणाले.
Post a Comment